Beed: साळेगाव येथील दोन सख्ख्या भावंडांचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू

दोन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली
Beed: साळेगाव येथील दोन सख्ख्या भावंडांचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू
Beed: साळेगाव येथील दोन सख्ख्या भावंडांचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यूSaam Tv

बीड : खदाणीत पाण्यात दोन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील साळेगाव शिवारात असणाऱ्या, दस्तगिर माळ भागात घडली आहे. अनिल बबन शिंदे (वय-6 वर्ष) आणि प्रकाश बबन शिंदे (वय- 8 वर्ष) रा. चिंचोली माळी असे बुडून मृत्यू पावलेल्या दोन चिमुकल्याची नावे आहेत. सदरील भावंड नेमके त्या ठिकाणी का गेले होते? घटना नेमकी कशी घडली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

हे देखील पहा-

या घटनेची सदर माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन खदाणीतून बालकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. यानंतर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही भावंडांचे मृतदेह पाठवण्यात आले आहेत. तर ही भावंड तिथं कशी गेली? नेमकी घटना कशी घडली? याचा अधिक तपास केज पोलीस करत आहेत. दरम्यान घटनास्थळी मयत मुलांची आई मैनाबाई पवार आणि वडील बबन पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकीत होता.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com