Beed: महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर...

बीडमध्ये बंदला सुरुवात
Beed: महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर...
Beed: महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर...विनोद जिरे

बीड - महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड Beed शिवसेना Shivsena आक्रमक झाली आहे. सकाळीचं रस्त्यावर उतरून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी केंद्र सरकार Central Government विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदची हाक दिली असून बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केली आहे.

हे देखीला पहा -

लाखमीपुर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि याच बंदला यशस्वी करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. यावेळी शिवसेनेकडून व्यापाऱ्याला गुलाबाचं फुल देऊन आपली - आपली दुकान बंद करण्याच आवाहन करण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेचे नेते बप्पासाहेब घुगे, परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर ,हनुमान जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.