Beed : पहिल्या पत्नीच्या मुलाला द्यावा लागत होता 'हिस्सा'; म्हणून बापाने संपवला मुलाचा 'किस्सा'!

पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावे जमीन करावी लागेल म्हणून, जन्मदात्या बापानेच पोटच्या 13 वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या खडकी घाट गावात उघडकीस आली आहे.
Beed : पहिल्या पत्नीच्या मुलाला द्यावा लागत होता  'हिस्सा'; म्हणून बापाने संपवला मुलाचा 'किस्सा'!
आरोपी उमेश वाघमारेविनोद जिरे

बीड : पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावाने जमीन करावी लागेल म्हणून, जन्मदात्या बापानेच पोटच्या 13 वर्षीय मुलाचा गळा दाबून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या खडकी घाट गावात उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोटच्या मुलाचा गळा घोटणाऱ्या नराधम बापाला, पोलिसांनी काही तासात अटक केली आहे. राकेश उमेश वाघमारे वय 13 असं मयत मुलाचं नाव आहे. तर, आरोपी उमेश वाघमारेच्या पोलिसांनी (Police) मुसक्या आवळ्या आहेत.

हे देखील पहा :

बीड (Beed) तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये, आज सकाळी 13 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आपल्या मुलाचा खून केलेल्या बापाला पकडले. उमेश वाघमारे असे त्या आरोपीचे नाव असून त्याने तीन विवाह केलेले आहेत. पहिली बायको सोडून गेली, दुसरीने आत्महत्या (Suicide) केली आणि तिसरी सोबत तो बीडमध्ये राहत आहे. पहिल्या पत्नीचा मुलगा राकेश हा आज्जी आजोबा सोबत खडकी घाट येथे राहत असताना, राकेश हा पहिल्या पत्नीचा मुलगा असल्याने वडिलोपार्जित सहा एकर जमीन पैकी काही जमीन राकेशच्या नावावर करावी लागेल, म्हणून वाद सुरु होता. या वादातून रात्री राकेश ला वस्तीवरील शेडमध्ये नेऊन त्याचा खून करून, नराधम उमेश पहाटेचं गाव सोडून निघून गेला.

आरोपी उमेश वाघमारे
Bollywood : अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा

सकाळी पत्र्याच्या शेडमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. राकेशचा घातपात आहे हे प्रथमदर्शनी पोलीस तपासातून समोर आले. त्यावेळी आजोबांनी दिलेल्या माहिती वरून उमेश पहाटेच गाव सोडून गेल्याची खबर मिळाल्यानंतर, नेकनूर पोलिसांनी तपस चक्रे फिरवत, आरोपी बापाला पाटोदा (Patoda) येथील पोलिसांच्या मदतीने पकडत बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून जन्मदात्या पित्यानेच प्रॉपर्टीच्या (Property) वादावरून, मुलाचा गळा घोटल्याने संताप व्यक्त जात केला आहे. या प्रकरणाचा तपास नेकनूर पोलीस करत असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का ? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

आरोपी उमेश वाघमारे
Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!
आरोपी उमेश वाघमारे
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
आरोपी उमेश वाघमारे
Breaking Beed : पोलीस पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या!

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com