Beed: आईसह 2 चिमुकल्या मुलींना सर्पदंश; दोन्ही मुलींचा मृत्यू!

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या सोने सांगवी गावात, अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे.
Beed: आईसह 2 चिमुकल्या मुलींना सर्पदंश; दोन्ही मुलींचा मृत्यू!
Beed: आईसह 2 चिमुकल्या मुलींना सर्पदंश; दोन्ही मुलींचा मृत्यू!विनोद जिरे

विनोद जिरे

बीड - बीडच्या Beed केज तालुक्यात असणाऱ्या सोने सांगवी गावात, अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्या मुलींना, मध्यरात्री सर्पदंश झाल्याने, दोन्ही मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे. स्वप्नाली साखरे (वय 5 वर्ष) व स्वीटी साखरे (वय 3 वर्ष) अशी मयत चिमुकल्या मुलींची नावे आहेत. तर आई जयश्री दीपक साखरे यांची, अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

हे देखील पहा-

केजच्या Kej सोनेसांगवी गावातील दीपक साखरे हे कुटुंबासह पत्नी जयश्री साखरे (वय 30 वर्ष), मुलगी स्वप्नाली साखरे व स्वीटी साखरे हे चौघे घरात झोपले होते. यादरम्यान जयश्री साखरे यांच्यासह दोन्ही चिमुकल्या मुलींना विषारी साप चावला. त्यात स्वप्नाली साखरे व स्वीटी साखरे या दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला.

Beed: आईसह 2 चिमुकल्या मुलींना सर्पदंश; दोन्ही मुलींचा मृत्यू!
अक्षय कुमारला मातृशोक, मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

तर आई जयश्री साखरे यांच्यावर अंबाजोगाई च्या स्वामी रामाननंद तिर्थ रुग्णायात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश होऊन दोन चिमुकल्यांचा जीव गेल्याच्या अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com