बीड : देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण; उपजिल्हाधिकारी आघाव पाटील अखेर निलंबित!

साम टीव्ही च्या बातमीची दखल; अखेर शासनाने काढले निलंबनाचे आदेश!
Prakash Aghav Patil
Prakash Aghav Patil SaamTv

बीड : बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या शेकडो एक्कर जमिनी लाटल्याचा प्रकार साम टीव्हीने समोर आणला होता. यामध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन.आर. शेळके आणि प्रकाश आघाव पाटील यांच्यावर गुन्हा देखील झालेला आहे. अखेर शासनाकडून साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आली असून आज घोटाळेबाज उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील याच्यावर संक्रांत आलीय. त्याच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने आज काढले आहेत.

हे देखील पहा :

बीड (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयातील भु-सूधारचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील याने अनेक जमिनी खालसा केल्याच्या तक्रारींचा पाऊस झाला होता. त्यामुळे चौकशी करण्यात येत होती. त्याच्यावर आष्टीत (Ashti) 3 तर बीडमध्ये 1 गुन्हा देखील दाखल झाला होता. तत्पूर्वी त्याची बदली करण्यात आलेली होती. परंतु त्यानी मध्यंतरी बीडला रूजू होण्याचा प्रयत्न केला, असता जिल्हाधिकार्‍यांनी त्याला रूजू करून घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

Prakash Aghav Patil
औरंगाबाद : कारमध्ये धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास अटक!

या सर्व घडामोडीनंतर अखेर प्रकाश आघाव पाटील याच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने (State Government) काढले असून त्याच्यावर जमीन खालसा प्रकरणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलीय. दरम्यान, बीड जिल्ह्यातील हजारो एक्कर जमिनी भूखंड माफियांनी आपल्या घशात घातली असून याची देखील चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com