Beed: 'मला रिव्हॉल्व्हर द्या' म्हणणाऱ्या अधिकाऱ्याची पालकमंत्र्यांनी घेतली दखल

धमकावणाऱ्यांची पोलिसात तक्रार करा, कारवाई होणार.
Beed: 'मला रिव्हॉल्व्हर द्या' म्हणणाऱ्या अधिकाऱ्याची पालकमंत्र्यांनी घेतली दखल
Dhananjay MundeSaam Tv News

बीड : अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संजय कोकणे यांनी आपल्यावर बिलांवर सह्या करण्यासाठी, दबाव टाकला जात असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करत रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली होती. तर याची बातमी साम टिव्हीने दाखवली होती. या बातमीची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दखल घेतली असून अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा कोणी प्रयत्न करत असेल तर खपवून घेणार नाही. धमकावणाऱ्यांची पोलिसात तक्रार करा, कारवाई होणार. असं धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) पत्रकातून म्हटलं आहे.

Dhananjay Munde
IPL 2022: मुंबई इंडियन्स सोडल्यामुंळ हार्दिक पांड्याला लागणार मोठी लॉटरी!

ते पत्रकात म्हणाले आहेत, की बीड जिल्ह्यात (Beed District) अधिकारी वर्गाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर अशा रीतीने दबाव आणायचे काम कोणी करत असेल, तो कोणत्याही पक्ष-संघटनेचा असेल, त्याची गय केली जाणार नाही. जिल्ह्यात सर्वच विभागातील चांगले काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही सदैव आहोत. अधिकारी वर्गावर दबाव आणायचा किंवा तत्सम कोणताही प्रकार जिल्ह्यात खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकातून दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com