4 वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला; देवदर्शनासाठी जातांना भरधाव ट्रँक्टरने चिरडले

बीडच्या मादळमोही येथील हृदयद्रावक घटना; चिमुकला ठार तर आज्जी गंभीर जखमी
4 वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला; देवदर्शनासाठी जातांना भरधाव ट्रँक्टरने चिरडले
Beed Accidentविनोद जिरे

बीड - 4 वर्षीय चिमुकला आपल्या आज्जीसोबत देवदर्शनाला पायी चालत जात असतांना, एका भरधाव वेगातील ट्रँक्टरने (Tractor) दोघांनाही चिरडले. यामध्ये या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर आज्जी देखील गंभीर जखमी झाली आहे. ही घटना काल उशिरा गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गावर घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माऊली अनिरुद्ध चव्हाण, वय 4 वर्षे रा.वंजारवाडी असे अपघातात (Accident) मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

हे देखील पहा -

तर सुमनबाई जालिंदर चव्हाण असे जखमी झालेल्या आजीचे नाव आहे. दरम्यान या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत ट्रँक्टर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ट्रँक्टर चालकाविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com