Beed : पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर दोघांना तलवारीने मारहाण!

बीडमध्ये पोलीस प्रशासनाला गुंडांचं आव्हान; पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरचं दोघांना तलवारीने मारहाण..! मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Beed : पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर दोघांना तलवारीने मारहाण!
Beed : पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर दोघांना तलवारीने मारहाण!विनोद जिरे

बीड : बीडमध्ये दिवसेंदिवस गुंडाराजच्या घटना समोर येत आहेत. भरदिवसा महिलेला चौकात मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या समोर लाकडी दांड्याने तीन तरुणांना मारहाण करण्यात आली होती. तर, आता पुन्हा एकदा काल रात्री दोन तरुणांवर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच तलवारीने हल्ला करण्यात आलाय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बीडमध्ये दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या मारहाणीच्या घटनेने, दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

हे देखील पहा :

बीड शहरासह जिल्हाभरात गुंड प्रवृत्ती वाढू लागली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने मारामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अखिल खान झहिर खान, कफिल खान झहिर खान रा.शहेंशाहवली दर्गा परिसर बीड, या दोघांना पाच जणांनी तलवारीने मारहाण केलीय. यात हे दोघे गंभीर जखमी झाले.

Beed : पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर दोघांना तलवारीने मारहाण!
Crime : लातूरचे गुटखा किंग हादरले; सव्वा कोटींचा गुटखा जप्त!

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेने बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान याविषयी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, शिवनाथ ठोंबरे यांना संपर्क केला असता, त्यांनी अद्याप कोणीही तक्रार दिले नाही. व्हिडिओ पाहिला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय मध्ये पोलीस कर्मचारी पाठवले असून शहानिशा करणं सुरू आहे. तक्रार आल्यास गुन्हा दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. अशी माहिती ठोंबरे यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.