Beed: आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

अतिवृष्टी होऊन एक महिना झाला अद्याप शासनाकडून एक रुपयाची मदत नाही
Beed: आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
Beed: आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्याSaam Tv

बीड -  ओल्या दुष्काळाने शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. 1 महिना उलटूनही अद्याप मदत मिळाली नाही, म्हणून  शेतकरी आता टोकाचं पाऊल उचलत आहे. बीड तालुक्यातील शहाजानपूर मध्ये अतिवृष्टीमुळे पीकासह माती देखील वाहून गेली, न भरून येणारे नुकसान झाले, आता कर्ज फेडायचे कोठून? या आर्थिक विवनचनेतून तरुण शेतकऱ्याने शेतातचं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही दुर्दैवी घटना आज उघडकीस आली आहे. अशोक बाबासाहेब मते वय 40 वर्ष असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच नाव आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

बीड तालुक्यातील शहाजानपूर येथील अशोक बाबासाहेब मते वय 40 वर्ष, या तरुण शेतकऱ्याने रात्रीच्या सुमारास शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला. अशोकने साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी जेवण केले आणि तो थेट शेतात गेला. यावर्षी मुसळधार पावसामुळे शेतातील उभे पीक पाण्याखाली गेलं. उत्पन्नाचे साधन नाही. आधीच शेतीसाठी कर्ज घेतलेले, घरातला कर्ता मोठा असल्याने कर्ज फेडायचे कुठून? कुटुंब चालवायचं कस? या आर्थिक विवंचनेतून अशोक मतेने हे टोकाचे पाऊल उचलले. रात्री तो उशीरापर्यंत घरी आला नाही. 

Beed: आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
धक्कादायक! वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

सकाळी शोधाशोध केली असता अशोकचा मृतदेह झाडाला लटकताना दिसून आला. या आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सरकारने तातडीची मदत करून शेतकऱ्यांना आधार द्यावा. अशी मागणी भाई मोहन गुंड यांनी केली आहे. अगोदरच लॉकडाऊनमध्ये आणि कोरोनाच्या संकटात अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा एकदा अतिवृष्टीने डबघाईला आहे. याच आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्यामुळे सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी आता केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.