Marriage Proposal To Gautami Patil: लग्नाला तयार असशील तर येऊन भेट; बीडच्या तरुणाचं गौतमीला पत्र, दिला घराचा पत्ता

Beed News Today: "गौतमी बोल तू होती का माझी परी"
Gautmai Patil Marriage
Gautmai Patil MarriageSaam Tv

Letter To Gautami Patil: आपल्या अदांची भुरळ घालत नजरेच्या इशाऱ्याने घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) कायम चर्चेत असते. आता या चर्चेत पुन्हा भर पडली आहे. बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला पत्र लिहीत थेट लग्नाची मागणी घातलीय. गौतमी तुझ्या सर्व इच्छा आणि अटी मला मान्य आहे बोल तू होती का माझी परी.." असं म्हणत आपल्या घराचा पत्ता देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं देखील त्याने म्हटलंय. (Latest Marathi News)

Gautmai Patil Marriage
Amol Kolhe On Gautami Patil: गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादात खासदार अमोल कोल्हेंची उडी; म्हणाले...

बीडच्या (Beed) केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील याने गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, की गौतमी पाटील तू होती का माझी परी, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. एका मुलाखतीत गौतमीने आपल्या लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे हे बोलून दाखवलं होत. त्यानंतर या तरुणीने गौतमीला पत्र लिहिलं आहे.

तुझ्या सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुणी लग्नाला तयार नसले तरी मी मानुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न (marriage) करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे.

त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर मला भेटायला ये मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे." असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. इतकेच नाही तर या तरुणीने आपल्या पत्रात घराचा पत्ता देखील लिहिला आहे. दरम्यान वराच्या शोधत असणारी गौतमी पाटील, बीडच्या या रोहन गलांडे पाटीलाच्या पत्राला काय उत्तर देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Beed News)

Gautmai Patil Marriage
Bhayandar Marriage News: नवरदेव मंडपात वाट पाहत उभा, नवरी अचानक लिफ्टमध्ये अडकली अन्.... भाईंदरमधील थरारक घटना

काय म्हणाली होती गौतमी?

गौतमी म्हणाली होती की, “आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून ईच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com