उन्हानं नागरिक बेजार, सरकारी तिजोरी मात्र मालामाल!

यंदा उन्हानं सगळ्यांनाचं बेजार करून सोडलंय. पण त्याच उन्हानं सरकारला मात्र, मालामाल केलंय.
उन्हानं नागरिक बेजार, सरकारी तिजोरी मात्र मालामाल!
HeatSaam Tv

माधव सावरगावे

औरंगाबाद : यंदा उन्हानं सगळ्यांनाचं बेजार करून सोडलंय. पण त्याच उन्हानं सरकारला मात्र, मालामाल केलंय. कारण यंदाच्या उन्हाळ्यात चिल्ड बिअरच्या विक्रमी विक्रीने सरकारच्या महसुलात घसघशीत वाढ झालीय.

यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाने बेजार झाले असताना मद्यप्रेमींना मात्र, बिअरच्या चिल्ड प्यालाचा आधार मिळाला. तो आधार यंदाच्या उन्हाळ्यात सरकारला विक्रमी महसूल देऊन गेला. नेहमी तहानलेल्या आणि बिअरचं कॅपिटल (Beer Capital) असलेल्या मराठवाड्यात (Marathwada) बिअरचा खप जोमात झाला. इतकंच नाही तर गेल्या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत बिअर उत्पादन करणाऱ्या सहा प्रमुख कंपन्यांनी यंदा उत्पादनात तब्बल १८३ टक्के वाढ केलीये. या वाढीसोबतच बिअरच्या विक्रीमध्ये २५२ टक्क्यांनी वाढ झालीय. आता इतकी बिअर पिली जातेय की, काही ठिकाणी बीअरचा तुटवडा भासू लागलाय.

Heat
अंबरनाथचा राज्य महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; 7 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर!

मराठवाड्यात २०२०-२१ मधील मेमध्ये ६३ लाख लिटर बीअर विक्री झाली होती. मात्र, यंदाच्या मे मध्ये २४८ लाख ४५ हजार लिटर बिअरची विक्री झाली. मागच्या आणि या वर्षाची तुलना केली असता ती तब्बल २९४ टक्के इतकी जास्त विक्री यंदाच्या उन्हाळ्यात झाली.

एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ७ लाख ५५ हजार लिटर बीअरची विक्री झाली. यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलआणि मे या दोन महिन्यात ४०३ कोटी रुपयांपर्यंत महसूल वाढला आहे. २०२०-२१ मध्ये ५० कोटी ८३ लाख रुपयांचा महसूल होता. या वर्षी ४५३ कोटी ८३ लाख रुपयांवर गेला आहे.

हे देखील पाहा-

बिअरची मागणी आणि विक्री ही विक्रमी झाल्यानं ज्या औरंगाबादमध्ये बिअर तयार होते, तिथेच काही ब्रँड बिअर शौकिनांना मिळत नाहीत. मात्र, यंदाच्या उन्हानं बिअरच्या उत्पादनात आणि विक्रीत विक्रम करायला लावला आहे. उन्हानं लाहीलाही झालेल्या अनेक जिवांना बिअरच्या चिल्ड घोटाने तृप्त केले आणि सरकारच्या तिजोरीची महसुलाची तहान यंदा बिअर कॅपिटलने भागवली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com