Aurangabad -भीक मागण्यासाठी चक्क मुलांना घेतलं विकत

ज्या वयात आई-वडिलांच्या आधाराशिवाय बाहेर जाऊ शकत नाही अशा आई वडिलांच्या कुशीत निर्धास्त असलेल्या दोन चिमुकल्यांना भिकाऱ्यांच्या रॅकेटने अवघ्या दीड लाख रुपयांत विकत घेतल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली
भीक मागण्यासाठी मुलं घेतली विकत औरंगाबादची घटना
भीक मागण्यासाठी मुलं घेतली विकत औरंगाबादची घटना- Saam Tv

औरंगाबाद : भीक मागणाऱ्या Begging एका महिलेने दीड लाखात दोन चिमुकली मुले विकत घेऊन त्यांना भीक मागायला लावल्याची घटना समोर आली आहे. पोटच्या आईकडूनच १०० रुपयांच्या बाँडवर Bond Paper व्यवहार करून एक पाच वर्षांचा, तर दुसरा दोन वर्षांचा मुलगा भीक मागणाऱ्या एका महिलेने विकत घेतला होता. women purchased small children for begging in Aurangabad

ज्या वयात आई-वडिलांच्या आधाराशिवाय बाहेर जाऊ शकत नाही अशा आई वडिलांच्या कुशीत निर्धास्त असलेल्या दोन चिमुकल्यांना भिकाऱ्यांच्या रॅकेटने अवघ्या दीड लाख रुपयांत विकत घेतल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये Aurangabad उघडकीस आली. एक पाच वर्षांच्या, तर दुसरा दोन वर्षांच्या मुलाच्या पालकांना पैशाचे आमिष दाखवत १०० रुपयांच्या बॉडवर हा व्यवहार करण्यात आला.

ही मुले मी दत्तक घेतल्याचा दावा या प्रकरणातील महिला आरोपींनी केला. मात्र, मुकुंदवाडी पोलिसांनी Police त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. समाजसेवक देवराज नाथाजी वीर (४७, रा. मुकुंदवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. रामनगर येथे जनाबाई उत्तम जाधव ही तिच्या घरी असलेल्या लहान मुलास अमानुषपणे मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते तिथे गेल्यानंतर जनाबाई जाधव आणि तिची मुलगी दोघी मिळून मुलास मारत होत्या. women purchased small children for begging in Aurangabad

भीक मागण्यासाठी मुलं घेतली विकत औरंगाबादची घटना
जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतक

त्यानंतर वीर यांनी पाच वर्षाच्या मुलास त्यांच्या ताब्यातून सोडवले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस दोन महिलांसह त्या बालकाला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलीस ठाण्यात लहान बालकांना आणल्यानंतर बालकल्याण संरक्षण कक्ष अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी त्या दोन मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मला भीक मागण्यासाठी आणले असून भीक मागितली नाही तर मला मारहाण केली जाते असे त्याने सांगितले.

यानंतर महिला आरोपी सविता पगारे हिची विचारपूस केली असता ५ वर्षीय मुलास बुलडाणा जिल्ह्यातून त्याच्या आई-वडिलांकडून मी ५५ हजार रुपयांत विकत घेतले, तर दुसऱ्या २ वर्षीय मुलास जालना जिल्ह्यातून १ लाख रुपयांमध्ये १०० रुपयांच्या बाँडवर दत्तक घेतले, असे तिने सांगितले. दोन्ही मुलांची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. women purchased small children for begging in Aurangabad

पाच वर्षीय मुलाशी संवाद साधला असता त्याने मला जनाबाई ही भीक मागायला लावत होती. जर मी तिचे ऐकले नाही तर तुला कापून नाल्यात फेकून देऊ, तुझ्या आई वडिलांनी विचारले तर कोरोनाने मेला असे सांगत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होती. रात्री मला बाथरूमध्ये झोपायला लावत होती, तासन्तास पाण्यात बसवून ठेवत असल्याने माझ्या पायाला जखमा झाल्याचेही सांगितले. सविता पगारे हिच्या लहान मुलांचे कपडेदेखील मला धुवायला लावत होती. कुटुंबीयांबाबत त्याला विचारले असता आजी-आजोबा अकोल्याला, तर आई-वडील देऊळगावात राहत असल्याचे त्याने सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा -

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com