बेळगाव महापालिका निवडणुक: एमआयएमचे शाहिदखान पठाण प्रभाग क्र. 18 मधून विजयी

बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमने खाते उघडले असून प्रभाग 18 मधून एमआयएमचे शाहिदखान गौसखान पठाण विजयी झाले आहेत.
बेळगाव महापालिका निवडणुक: एमआयएमचे शाहिदखान पठाण प्रभाग क्र. 18 मधून विजयी
बेळगाव महापालिका निवडणुक: एमआयएमचे शाहिदखान पठाण प्रभाग क्र. 18 मधून विजयीसंभाजी थोरात

बेळगाव: बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमने खाते उघडले असून प्रभाग 18 मधून एमआयएमचे शाहिदखान गौसखान पठाण तर प्रभाग क्रमांक 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडोळकर विजयी झाले आहेत. सुरुवातीच्या निकालानुसार काँग्रेसने 3 प्रभागात विजय मिळवला आहे. (Belgaum Municipal Election: MIM Shahid Khan Pathan Won from ward no.18)

हे देखील पहा -

प्रभाग क्रमांक 16 मधून राजू भातकांडे, प्रभाग क्रमांक 40 मधून रेश्मा कामकर, प्रभाग 18 मधून एमआयएमचे शाहिदखान गौसखान पठाण तसेच बाबजान मतवाले प्रभाग क्रमांक, प्रभाग क्रमांक 11 मधून समीउल्ला माडीवाले, प्रभाग क्रमांक 29 मधून नितीन जाधव विजय झाले आहेत. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण होण्याचा मार्गावर असून पहिल्या फेरीत काँग्रेस व भाजपला यश मिळाले असून उर्दू भाषिक उमेदवार अधिक संख्येने विजयी झाले असून लवकरच दुसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

बेळगाव महापालिका निवडणुक: एमआयएमचे शाहिदखान पठाण प्रभाग क्र. 18 मधून विजयी
शेतकरी मेळाव्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; आयोजकांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय निश्चित मानला जात असलेल्या चार ठिकाणी समितीचा पराभव झाला असून आतापर्यंत भाजप 4, काँगेस 4, एमआयएम 1, समिती 1 व 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com