Belgaum News पोलीसांचा हुल्लडबाज समर्थकांना चोप

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत ( Belgaum Municipal Corporation Election) भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं.
Belgaum News पोलीसांचा हुल्लडबाज समर्थकांना चोप
Belgaum News पोलीसांचा हुल्लडबाज समर्थकांना चोप

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत ( Belgaum Municipal Corporation Election) भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 29 जागांवर आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र दुसरीकडे भाजपा समर्थकांना पोलीसांनी चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना नियमांची (Covid 19 guildlines) पायमल्ली करत भाजपा समर्थकांनी एका ठिकाणी गर्दी करत जल्लोष केल्याने पोलीसांनी त्यांना चांगलाच चोप दिल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा-

बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याच स्पष्ट झाल्यानतंर भाजपा समर्थकांनी मोठा जल्लोष करत एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. हे पाहता पोलीसांनी त्यांना चोप देत गर्दी पांगवली आहे. मात्र दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं शिवसेना नेते संजय राऊत याचं स्वप्न मात्र भंगलं आहे.

edited by- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com