Beed Crime: धक्कादायक! बीडच्या सराफ व्यापाऱ्यांना बंगाली बाबूने लावला चुना; तब्बल 30 लाखांचे सोने घेऊन फरार

Bee Crime Upate: पावत्या नसल्याने पोलिस तक्रारही व्यापारी पुढे येत नसल्याने हे दागिने चोरीचे आहेत का? असाही संशय व्यक्त केली जात आहे..
Beed  News
Beed NewsSaamtv

Beed News: बीडच्या माजलगाव शहरातील 5 सराफा व्यापाऱ्यांना एका कारागीर असणाऱ्या बंगाली बाबूने गंडा घातल्याची बातमी समोर आली आहे. दागिन्यांची डिझाइन बनवायला दिलेले सोने, बंगाली कारागिराने परत न करता, तो फरार झाला आहे. याबाबत सराफ व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली असून पावत्या नसल्याने याची अद्यापही पोलिस ठाण्यात नोंद झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Beed  News
BMC Election News : उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाटेमुळे बीएमसीची निवडणूक पुढच्या वर्षीपर्यंत ढकलली जाण्याची शक्यता

याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव (Beed) शहरात जवळपास 150 सराफा दुकाने आहेत. यातील बहुतांश व्यापारी हे सोने देऊन कारागिरांकडून विविध डिझाइनमध्ये दागिने तयार करून घेतात. अशाच प्रकारे शहरातील 5 सराफा व्यापाऱ्यांनी डिझाइन बनविण्यासाठी दिलेले सोने घेऊन, एका बंगालीबाबूने माजलगाव शहरातून धूम ठोकली. (Latest Marathi News)

त्याने जवळपास अर्धा किलो सोने नेल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर एक दुचाकीही (क्र. MH 20 EX 3134) घेऊन गेल्याचे सराफा व्यापारी सांगतात. त्याने नेलेल्या सोन्याची किंमत जवळपास 30 लाख रुपये व दुचाकीची किंमत 90 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Beed  News
Gadchiroli Accident News: पाण्याने केला घात; एकाच गावातील ४ तरुणांचा गुदमरून मत्यू

याविषयी संबंधित सर्व व्यापारी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. परंतु पोलिसांनी सोन्याच्या पावत्या मागितल्याने हे सराफ व्यापारी परत आले. त्यानंतर ते पोलिस ठाण्याकडे फिरकलेच नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान यामुळं व्यापारीही संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून, हे सोने चोरीचे तर नसेल ना? अशी चर्चा शहरात सुरू आहे.(Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com