गुन्हेगारांनो सावधान: नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार

नांदेड पोलिस मुख्यालयातील आसना विश्रामग्रह येथे शुक्रवारी (ता. १६) रोजी अतिरिक्त पोलिस अधीक्षक नांदेड यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
गुन्हेगारांनो सावधान: नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार
नांदेड पोलिस प्रशिक्षण कार्यशाळा

नांदेड : जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांवर आळा बसावा यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रभावशाली कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांना तडीपार, एमपीडीए व मोक्काचा प्रभावी वापर व उत्तम दर्जाचे प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. Beware-criminals- Criminals- in- Nanded- district- will -be -caught -soon

नांदेड पोलिस मुख्यालयातील आसना विश्रामग्रह येथे शुक्रवारी (ता. १६) रोजी अतिरिक्त पोलिस अधीक्षक नांदेड यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून औरंगाबाद पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे द्वारकादास भांगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

हेही वाचा- शहराच्या विणकर कॉलनी परिसरात एकावर गोळीबार करुन ६५ हजार रुपयाचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारासह दोघांना इतवारा पोलिसांनी केली अटक

या कार्यशाळेत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला. व कोणत्या गुन्हेगारांवर कोणता प्रस्ताव प्रभावशाली बसतो व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी कशा पद्धतीने तडीपार, एमपीडीए व मोक्का प्रस्ताव तयार करावा. कायद्यातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय इत्यादीबाबत व प्रस्तावातील त्रुटीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आगामी काळात पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर तडीपार, एमपीडीए व मोक्का अंतर्गत प्रभावशाली कारवाई करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेसाठी नांदेड कार्यक्षेत्रातील २५ अधिकारी व ६५ अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यशाळेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह शहरातील सर्व ठाणेदार उपस्तित होते. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास भांगे यांचे स्वागत केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com