'काकांनी मला मठात नेले आणि मी मंत्री झालाे'

'काकांनी मला मठात नेले आणि मी मंत्री झालाे'
Bhagat Singh Koshiyari

सांगली : स्वतः साठी जगणारी माणसे असतात पण दुसऱ्यासाठी जगणारी कमीच आहेत. माणसांवर प्रेम करणारी माणसं म्हणजे दिपाली सय्यद भोसले आणि त्यांचा ट्रस्ट. या ट्रस्टच्या माध्यमातून खूप माेठे काम आज समाजात हाेत असल्याचा आनंद वाटताे असे मत केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. कसबे डिग्रज येथे दिपाली सय्यद भाेसले यांच्या फाैंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना राज्यपाल भगतसिंह काेशियारी यांच्या हस्ते मदत देण्यात आली. त्यापुर्वी झालेल्या भाषणात मंत्री पाटील यांनी फाैंडेशनच्या कार्याचे काैतुक केले. bhagat-singh-koshiyari-jayant-patil-dhairyasheel-mane-kapil-patil-jayant-patil-sangli-sml80

मंत्री पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाचा धागा पकडत म्हणाले काकांनी सांगितले तुम्हाला भीती वाटू लागली का काय पण त्यांनी समाजासाठी चांगले काम आहे. काका मला मठात घेऊन गेले आणि मी मंत्री झालो. पण संजयकाका यांना मठात घेऊन जा तेही मंत्री होतील.

योगी आदित्यनाथ यांच्या बरोबर त्यावेळी मी मठात गेलो असतो तर त्यावेळी मंत्री झालो असतो. राज्यपाल यांनी मला विमानातून आणले तर मी येऊ शकेल म्हणून केंद्रातील मंत्री म्हणून मला राज्यपाल यांनी घेऊन आले. आता असे झाले की विरोधक पण राज्यपाल यांच्याकडे जातात अशी टिप्पणी मंत्री पाटील यांनी केली.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले पूरग्रस्त भागात अनेकजण येतात मदत करतो म्हणतात निघून जातात परंतु दीपाली सय्यद यांनी अशा प्रकारे मदत करून चांगले काम केले आहे. राज्यपाल Bhagat Singh Koshiyari या कार्यक्रमास आल्याने त्यांचे आभार. ते सेवभावीवृत्तीचे आहेत. यावेळी मंत्री पाटील यांनी राज्यपालांना पूर परिस्थिती आणि त्यानंतरची आपत्ती सांगितली.

Bhagat Singh Koshiyari
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

मंत्री पाटील म्हणाले उत्तराखंड भागातील राज्यपाल आहेत. उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या आधी येथील मठात त्यांनी भेट दिली होती. मला विश्वास नाही बसला पण त्यांच्याबरोबर खासदार संजय पाटील होते. हे सगळे भक्त आहेत. तुम्ही भक्त आहात का नाही माहीत नाही. मी तुम्हांला परत एकदा बोलावतो आणि मच्छिद्रनाथ येथे भेट द्या असे विनंती करताे असेही पाटील यांनी नमूद केले.

यावेळी खासदार धैर्यशिल माने यांनी दिपाली सय्यद भाेसले यांच्या फाैंडेशनच्या कार्याचे काैतुक केले. यावेळी खासदार माने यांनी राज्यपाल भगतसिंह काेशियारी यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही प्रसिद्ध असे राज्यपाल आहात असेही नमूद केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com