Bhandara: महावितरणाच्या शॉकने तब्बल 56 गावे अंधारात!

भंडारा जिल्ह्यातील 56 गावातील लोक होतात 6 च्या आत घरात! होय, भंडारा महावितरणाने दिलेल्या शॉक ने 56 गावे गेली अंधारात गेली आहेत.
Bhandara: महावितरणाच्या शॉकने तब्बल 56 गावे अंधारात!
Bhandara: महावितरणाच्या शॉकने तब्बल 56 गावे अंधारात!अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील 56 गावातील लोक होतात 6 च्या आत घरात! होय, भंडारा महावितरणाने दिलेल्या शॉक ने 56 गावे गेली अंधारात गेली आहेत. 56 गावांच्या पथदिव्यांच्या बिला पोटी 12 कोटी 75 थकल्याने महावितणाने ह्या थकबाक़ी पोटी 56 गावांच्या पथदिव्यांची लाइट कापली आहे. त्यामुळे सांध्यकाळचे 6 वाजले की, सर्वत्र अंधराच्या काळोख पसरत असल्याने ह्या 56 गावाचे लोक घरीच राहणे पसंत करत असून ह्या 56 गावात संध्याकाळी 6 नंतर अघोषित कर्फ्यू लागत आहे.

हे देखील पहा-

भंडारा जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायती असून त्या अंतर्गत 898 महसूली गावे आहेत. ह्या प्रत्येक गावात पथदिवे आहेत. भंडारा विज वितरण कंपनीकडे ह्या पथदिव्यांचे 1200 ग्राहक आहेत. ह्या ग्राहकापैकी 1097 ग्राहक थकबाकी ग्राहक असून 3 वर्षाच्या विज बीला पोटी तब्बल 12 कोटी 75 लाख रूपये थकले आहेत. त्यामुळे थकित बिलाबाबात वारंवार ग्रामपंचायतला संपर्क साधला असता अद्याप पैसे न भरल्याने 56 ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली आहे.

Bhandara: महावितरणाच्या शॉकने तब्बल 56 गावे अंधारात!
Lonavla: गाईंना बेशुद्ध करून पळविण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

पूर्वी ग्रामपंचायतीचे पथदिव्यांचे वीज बिल शासन स्तरावर भरले जात होते. त्यामुळे ग्रामपंचायतीला चिंता नव्हती मात्र शासनाने हात वर केले असून आता त्या ग्रामपंचायतीने स्वतःचे पथदिव्यांचे विजबिल भरायचे आहे. तर एन पोळा दीवाळी सारख्या सणावर विज कापल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून रात्री 6 नंतर चक्क अंधराचे सामाज्य पसरत असल्याने वन्यजीव व सरपटनारे प्राणी यांच्या भीतीने गावातील नागरिक बाहेर निघण्यास धजावत नाही आहे.

एकंदरीत ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे विज बिल कुणी भरावे यावरून आता वाद विवाद सुरु झाला असून येत्या काळात मात्र शासन आणि ग्रामपंचायत यात संघर्ष अटळ आहे. यात मात्र महावितरनाने विज खंडित करण्याचा सपाटा लावाला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com