शाळेच्या आवारातील बांधकाम थांबवा; भंडाऱ्यामध्ये शाळा बचाव समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन!

बांधकाम थांबत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.
शाळेच्या आवारातील बांधकाम थांबवा; भंडाऱ्यामध्ये शाळा बचाव समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन!
शाळेच्या आवारातील बांधकाम थांबवा; भंडाऱ्यामध्ये शाळा बचाव समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन! अभिजीत घोरमारे

भंडारा : 'शाळा वाचवा, भंडारा वाचवा ' Save the school हा नारा घेऊन "मनरो शाळा बचाव समिति" वतीने ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये या शाळेमधील माजी विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत इतिहासकालीन शाळेच्या आवारात करण्यात येणारे दुकानाचे बांधकाम Construction थांबविण्याची मागणी. Bhandara agitation to stop construction of school premises

हे देखील पहा-

भंडारा शहरातील इंग्रजकालीन असलेले लाल बहाद्दुर शास्त्री विद्यालय Lal Bahadur Shastri Schoo परिसरामध्ये भंडारा जिल्हा परिषदेतर्फे Bhandara Zilla Parishad दुकानाच्या गाळयांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या बांधकामाला शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी तसेच शहरातील काही सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे या सर्वांची मागणी एकच आहे शाळेच्या आवारात सुरु असलेले बांधकाम रद्द करावे अशी आहे.

शाळेच्या आवारातील बांधकाम थांबवा; भंडाऱ्यामध्ये शाळा बचाव समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन!
जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक!

दरम्यान त्यांच्या याच मागणीसाठी आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली असून या आंदोलनामध्ये या शाळेमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी या शाळेमधून शिकून डॉक्टर, वकील, इंजीनियर झालेले अनेक मोठ्या हुद्यांवरती असलेले सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. जो पर्यंत शाळेमध्ये सुरु असलेले दुकान गाळे बांधकाम थांबत नाही तो पर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा ही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com