घरातील फरशी साफ करताना कुलरला हात लागला; अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

सुचिता धनपाल चौधरी (वय 22, रा. पाहुणगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे.
घरातील फरशी साफ करताना कुलरला हात लागला; अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं!
Suchita Choudhari Bhandara NewsSaam TV

भंडारा : घरातील फरशी साफ करतांना कुलरमधील विजेचा जबर धक्का लागला आणि त्यातच एका तरुणीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातल्या पाहुणगावात गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. सुचिता धनपाल चौधरी (वय 22, रा. पाहुणगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Suchita Choudhari Bhandara News
मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा; पोलिसाची कॉलर पकडली, VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, पाहुणगावात राहणारी सुचिता धनपाल चौधरी ही तरुणी गुरूवारी दुपारच्या सुमारास घरात साफसफाईचे काम करत होती. दरम्यान, घरातील फरशी साफ करताना घरात कुलर लावला होता. त्याचवेळी सुचिताचा हात कुलरला लागला. कुलरमध्ये विद्युतप्रवाह उतरला असल्याने तिला विजेचा जबर धक्का लागला. आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली.

Suchita Choudhari Bhandara News
सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; शेतीच्या वादातून त्याने चक्क मोठ्या भावाला संपवलं

दरम्यान, सुचिता कोसळताच घरातील इतर सदस्यांनी तिच्याकडे धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुचिताला उपचारासाठी तातडीने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं.

या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com