नदीत अस्थी विसर्जन करणे बेतले युवकाच्या जीवावर; भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

भंडारा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजीच्या अस्थी विसर्जनाकरिता आलेल्या २५ वर्षीय युवकाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
नदीत अस्थी विसर्जन करणे बेतले युवकाच्या जीवावर; भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
File Photo Saam Tv

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजीच्या अस्थी विसर्जनाकरिता आलेल्या २५ वर्षीय युवकाचा वैनगंगा नदीत (River) बुडून मृत्यू झाला आहे. पवनी तालुक्यातील वैजेश्वर घाटावर ही घटना घडली आहे. युवकाच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (Bhandara Latest News In Marathi )

File Photo
शालेय पाेषण आहाराचे धान्य विकले; संस्थेच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक, शिक्षकांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार , प्रशांत धोंडबाजी ठाकरे हे नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. चंद्रपुरचा प्रशांत आज सकाळच्या दरम्यान आंबोली येथे राहणाऱ्या आजी मैनाबाई मनिराम पोटे यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी पवनी येथील वैनगंगा नदीच्या वैजेश्वर घाटावर आला होता. अस्थी विसर्जन झाल्यावर आंघोळ करण्यासाठी नदी पात्रात उतरला. मात्र, त्यावेळी प्रशांतला खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. प्रशांतच्या मृत्यूनंतर त्याचा कुटुंबावर शोककळा पसरली आहे. युवकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्यानंतर गावातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

File Photo
एटीएसची मोठी कारवाई! 'लष्कर ए तोयबा'शी संबंधित आणखी एकाला उत्तर प्रदेशातून अटक

दरम्यान, प्रशांत ठाकरे या युवकाचा मृतदेह न सापडल्याने याची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली आहे. रेस्क्यू टीमकडून शोध सुरू करण्यात आला. पोलिस आणि रेस्क्यू टीमच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी रघुनाथ गजानन पोटे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. दरम्यान, मृतक प्रशांत ठाकरे याचे मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. पवनी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com