Bhandara Crime: भंडाऱ्यात दृश्यमचा थरार! ४ वर्षापुर्वीच्या हत्येचा उलघडा; आरोपीही अटकेत, पण मृतदेह?

2019 मध्ये कामाच्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या अर्चना राऊत नामक युवतीचा खून झाल्याचे उघड झाले आहे.
Bhandara Crime
Bhandara CrimeSaamtv

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Bhandara News: भंडारा जिल्हात दृश्यम चित्रपटाला शोभेल असा खुनाच्या प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यातील 23 वर्षीय मुलीच्या हत्येचा गुन्हा सिध्द झाला. आरोपीही अटक झाले मात्र अद्याप मात्र 4 दिवस शोध घेऊनही पोलिसांना तरूणीचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे या हत्येचे गूढ नेमके काय याबद्दल उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

Bhandara Crime
Jalna News: शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवला एक किलो कापूस; चुकीच्या आयात, निर्यात धोरणाचा निषेध

याबाबत अधिक माहिती अशी की, हे संपूर्ण प्रकरण चार वर्षापुर्वीचे असून 2019 मध्ये कामाच्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या कवलेवाडा येथील अर्चना राऊत नामक युवतीचा खून झाल्याचे उघड झाले आहे. मृतदेह सापडला नसला तरी साक्षीदाराच्या माहितीवरुन तब्बल चार वर्षांनंतर गोबरवाही पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तिघांना गजाआड केले गेले आहे.

अंगावर शहारे आणणाऱ्या सदर घटनेत पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांच्या आदेशावरून गोबरवाही पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये संजय चित्तरंजन बोरकर (47), राजकुमार उर्फ राजु चितरंजन बोरकर ( 50 ) दोघेही राहणार नेहरू वार्ड, कवलेवाडा व धरम फागु सयाम(42) रा. मोहगाव टोला यांचा समावेश आहे. तुमसर न्यायालयाने 31 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

Bhandara Crime
Narkhed Krushi Utpanna Bazar Samiti News : काका - पुतण्याच्या प्रतिष्ठेच्या लढाईत एक मत ठरलं निर्णायक, देशमुख गटाचा जल्लाेष

मात्र पोलिसांनी घटनेत लिप्त तिघांविरुद्ध कलम 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला खरा अद्यापही पोलिसांना अर्चनाचा मृतदेह गवसलेला नाही. त्यामुळे या हत्येचे गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांनी घटनेतील तिघांविरुद्ध कलम 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांचा शोध अद्याप सुरु आहे. (Bhandara News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com