चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून; आरोपी पतिचे आत्मसमर्पण

2015 ला गोंदिया निवासी स्नेहलताचे भंडारा जिल्ह्याच्या नेहरवानी येथील लंकेश्वर यांचा शुभमंगल होऊन संसार सुरु झाला.
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून; आरोपी पतिचे आत्मसमर्पण
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा आवळून खुन; आरोपी पतिचे आत्मसमर्पण अभिजीत घोरमारे

भंडारा: पत्नीच्या चारित्रा वर संशय घेत मध्यरात्रीच्या सुमारास ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या (Bhandra District) जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दित राजेदहेगाव येथील सुयोगनगर येथे घडली आहे. सकाळी पतिले स्वता: जवाहरनगर पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण केल्याने संबधीत घटना उघड़ झाली आहे. स्नेहलता लंकेश्वर खांडेकर वय 24 वर्ष असे मृतकाचे नाव असून आरोपी पतिचे नाव लंकेश्वर खेमराज खांडेकर वय 34 वर्ष असून आर्डिनेंस फैक्ट्री भंडारा येथील कैंटीन मध्ये कुक पदावर कार्यरत आहे.

2015 ला गोंदिया निवासी स्नेहलताचे भंडारा जिल्ह्याच्या नेहरवानी येथील लंकेश्वर याच्या सोबत शुभमंगल होऊन संसार सुरु झाला. गुण्या गोविंदाने संसार सुरु असतांना त्यांना एक चिमुकली ही झाली. मात्र कालांतराने लंकेश्वर याच्या स्वभावात बदल होऊ लागला व तो स्नेहलताच्या चारित्रावर संशय घेऊ लागला. यामुळे लंकेश्वर व मृतक स्नेहलताचे खटके उडु लागले.

यात काल मध्यरात्री मात्र काळाला अजुन काही मान्य होते. यात मध्यरात्री 1 च्या सुमारास लंकेश्वर व स्नेहलता यांत कड़ाक्याचे भांडण झाले. दरम्यान लंकेश्वरने ओढ़नीने स्नेनलताचा गळा आवळन्यास सुरुवात केली यात दम घुटुन स्नेहलताचा मृत्यु झाला. सकाळी लंकेश्वर यास आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला व सरळ जवाहर नगर पोलिस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले. पती पत्नीच्या ह्या भांडनात मात्र 3 वर्षाच्या चिमुकलीला अनाथाचे जीवन जगावे लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com