
अभिजीत घोरमारे
Bandara : भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील खरबी येथे पिसाळलेल्या कुत्राची दहशत पसरली आहे. येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने 4 जणांचा चावा घेतला आहे. तसेच एका महिलेवर या कुत्र्याने मोठा हल्ला केला आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. (Stray Dog)
या कुत्र्यामुळे परिसरात नागरिक भयभीत झालेत. घरातून बाहेर पडताना नागरिकांना भीती वाटत आहे. लहान मुलांना शाळेत अथवा परिसरात एकटे सोडणे कठीण झाले आहे. या कुत्र्याने आतापर्यंत 4 लोकांचा चावा घेतला आहे. तसेच एक महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यमुना महादेव नरखेडे (65, खरबी), माया ठवकर, सुरेश पाटिल अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. गुलाब गोमासे यांच्या मालकीच्या पाळीव जनावरांवरही पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे नागरिकांत व पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पिपंरी चिंचवड परिसरात देखील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवडच्या संत तुकारामनगर परिसरातील एका सहा वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला करत चावा घेतला होता. या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.