Bhandara News: दुर्देवी घटना! पाय घसरला अन् अनर्थ घडला... शेततळ्यात बुडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू

भैरुदास सुखदेव गोटेफोडे हे लाखांदूर येथील जय माता डी ट्रेडर्सचां मालकही होते.
Bhandara News
Bhandara NewsSaamtv

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Bhandara News: शेतीच्या धुऱ्या वरून पाय घसरून शेततळ्यात पडलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर येथे उघडकीस आली. भैरुदास सुखदेव गोटाफोडे (वय ४५ वर्ष) रां.लाखांदूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhandara News
Nandurbar Accident: मजुरांना घेवून जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात! एकाचा मृत्यू; १५ जण जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर येथिल भैरुदास गोटाफोडे हे दररोज सकाळी शेतावर जाण्याचा नित्यक्रम असल्याने आज सुध्दा शेतावर गेले होते. सकाळी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतावरील धूर्यावरून चालत जात असताना अचानक पाय घसरून सहा फूट खोल असलेल्या शेततळ्यात पडले.

अंगात रेनकोट टाकला असल्यामुळे बाहेर निघता न आल्याने खोल पाण्यात बुडून भैरुडास गोताफोडे यांचा मृत्यू झाला. इकडे घरी न आल्याने घरचे लोक शेतावर गेले असता भैरूदास पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसला. याबाबतची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली.

Bhandara News
Sharad Pawar Speech: 'म्हणून मी माफी मागायला आलोय...' येवल्याच्या विराट सभेत असं का म्हणाले शरद पवार?

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह पाण्याबाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले. दरम्यान, भैरुदास सुखदेव गोटेफोडे हे लाखांदूर येथील जय माता डी ट्रेडर्सचां मालकही होते. ते लाखांदूर येथील नगर पंचायतीच्या माजी नगरसेविका रिता गोटेफोडे यांचे पती आहेत. त्यांच्या पाठीमागे दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com