Bhandara: पूरपीडित रस्त्यावर; आंधळगाव येथे रास्ता रोको आंदोलन

पूरपीडित रस्त्यावर; आंधळगाव येथे रास्ता रोको आंदोलन
Bhandara News
Bhandara NewsSaam tv

भंडारा : पुरात नुकसान झालेल्या क्षतिग्रस्ताची योग्य यादी तयार करण्यात यावी. यादीत आलेल्या बोगस लोकांची नावे रद्द करावी; या मागणी घेऊन पुरपीडितांनी रास्ता रोको केला. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या आंधळगावात रास्‍तारोको केला आहे. वेळीच महसूल व पोलिस (Police) प्रशासनने हस्तक्षेप केल्याने आंदोलन मावळले आहे. (Bhandara News Road Block)

Bhandara News
Bhandara: मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती चिंताजनक

आंधळगाव येथे ८ व ९ ऑगस्टला आलेल्या पुरामुळे आंधळ गावातील आंबेडकर वार्ड कुंभार मोहला येथील चाळीस ते पन्नास घरामध्ये पुराच्या पाण्याने शिरले. यावेळी प्रशासनाच्यावतीने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपत्ती विभागाने सदर घरांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची आश्वासन देण्यात आले. यात मोहाडी महसूल प्रशासनाने चार तलाठ्यांची नियुक्ती करून पंचनामे केले. त्यात आंधळगावातील 112 लोकांचे क्षतिग्रस्त झाल्याची नोंद केली.

पूरपीडीत कुटूंबाचेच पंचनामे नाही

यादीमध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी नव्हते किंवा ज्यांचे घर अगोदरचे पडलेले होते; अशा लोकांच्या नावाने पंचनामे केल्यामुळे व क्षतिग्रस्त झालेले पूरपीडीत कुटुंब पंचनामेपासून वंचित राहिले. यामुळे आंधळगाव येथील पूरपीडितग्रस्तांनी जिल्हा परिषद शाळेच्या चौकासमोर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोकोची दखल घेत पुन्हा पंचनामे करून मोबदला देण्यात येईल; असे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी गावातील पाचशे ते सहाशे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com