Bhandara News : दहावीच्या परीक्षेच्या दिवशी वडीलांचा मृत्यू; डोळ्यात अश्रू साठवून मुलीने सोडवला पेपर...

Latest Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Bhandara News
Bhandara NewsSaam Tv

Bhandara News in marathi : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऐन इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी वडिलांच्या मृत्यूची बातमी आली. त्यानंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. वडीलांचा अंत्यविधी सोडून मुलीने दहावीचा पेपर देण्याची तयारी दर्शवून काळजावर दगड ठेवत पेपर लिहिला. प्राची राधेश्याम सोंदरकर रा. सोनी असं विद्यार्थिनीचं नाव आहे. (Latest Marathi News)

Bhandara News
Dhule News: गिरीश महाजन पोहचले बांधावर; अवकाळी पावसानंतर शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी

लाखांदूर तालुक्यातील सोनी-संगम इथले रहिवासी असलेले राधेशाम सोंदरकर यांचा गवल्या महिन्यात अपघात (Accident) झाला होता. अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत राधेशाम यांचा अपघात झाला होता. त्यांनी प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. राधेशाम यांना दोन मुली असून, मोठी मुलगी दहावीत तर लहान मुलगी सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे.

दरम्यान, एकीकडे राधेशाम यांच्यावर उपचार सुरु असतानाच मुलीची दहावीची परीक्षा तोंडावर होती. त्यामूळे प्राचीने दहावीच्या परीक्षेची तयारी अविरत सुरु ठेवली. 6 तारखेला इंग्रजीच्या पेपरची तयार करत असताना अचानक फोन आला आणि परीक्षार्थी मुलीने उचलला. वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच मुलगी नि:शब्द झाली आणि आई, आजी, काका, काकू, लहान बहीण रडायला लागले. मात्र प्राचीने वडिलांच्या मृत्यूचे दु:ख लपवून ठेवत न रडता आपले ध्येय गाठायचा प्रण केला. तयारी करुन परीक्षा केंद्र गाठलं.

Bhandara News
Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; CM शिंदेंचे निर्देश

प्राचीच्या हायस्कुलचे मुख्याध्यापक ह्यांना घडनेची माहिती झाल्याने त्यांनी प्राचीला पेपर सोडविण्यासाठी धीर देऊन, वडीलांची स्वप्नपुर्ती करण्यास सांगितल्याने. प्राचीने देखील घरी वडीलांचा अंत्यविधी असतांना तिने धैर्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली आहे. प्राचीच्या या धाडसी निर्णयामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com