Bhandara Rain: मुसळधार पावसाचा कहर; जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसाचा कहर; जिल्ह्यातील 18 गाव मार्ग बंद
Bhandara Heavy Rain
Bhandara Heavy RainSaam tv

भंडारा : मागील काही दिवसांपासून राज्‍यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यात भंडारा जिल्‍ह्यात (Bhandara News) देखील पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसाने (Bhandara) भंडारा जिल्हात पावसाने (Rain) पाणी साचल्याने अनेक गाव मार्ग बंद झाले आहेत. यामुळे जिल्‍हा प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. (Bhandara News Heavy Rain)

सततच्‍या पावसामुळे (Heavy Rain) रस्‍यांवर पाणी साचले आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल 18 गाव मार्ग बंद आहेत. यामध्ये भंडारा, साकोली, तुमसर, पवनी व मोहाडी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. यात भंडारा तालुक्यातील कारधा ते करडी, पवनी तालुक्यातील पवनी ते जुनोना, निलज ते काकेपर, तुमसर तालुक्यातील सिलेगाव ते वाहनी, साकोली तालुक्यातील वडेगाव ते खांबा, साकोली ते विरशी व मोहाडी तालुक्यातील आंधळगाव ते पेट, विटगाव ते टांगा, डोंगरगाव ते कानळगाव, अकोला ते वडेगाव, चिचोली ते शिवनी, चिचोली ते नवेगाव, रोहना ते इंदूरका, महालगाव ते मोरगाव, चाउंडेश्वरी लहान पूल, मोहाडी ते मांडेसर, टांगा ते विहीरगाव, उसर्रा ते टाकला असे ऐकूण 18 गावमार्ग बंद आहे. या सर्व गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com