Bhandara News: संजय राऊतांना उशिरा आलेले शहानपण; अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा राऊतांना टोला

संजय राऊतांना उशिरा आलेले शहानपण; अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा राऊतांना टोला
Bhandara News
Bhandara NewsSaam tv

भंडारा : आम्ही सुरुवातीपासून म्हणत होते महाविकास आघाडी सरकार ही हिंदू विरोधी आहे. परंतु, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकर यांच्‍याबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍यानंतर संजय राऊतांना (Sanjay Raut) उशिरा शहानपण आले; असा खोचक टोला शिंदे गटातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राऊत यांना लगावला आहे. (Tajya Batmya)

Bhandara News
Sangli News: राहुल गांधींच्‍या पोस्‍टरला मारले जोडे; भाजपचे सांगलीत तीव्र आंदोलन

सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्‍यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) फुट पड़ू शकते; असे खासदार संजय राऊत यांनी म्‍हटले. त्‍यांच्‍या या वक्तव्यावर आमदार भोंडेकर बोलत होते. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सतत सांगायचो, भाजपसोबत या. आपली (BJP) भाजप सोबतची युती ही नैसर्गिक युती आहे. घरात भांडण होत असतात. मात्र सर्व एकत्र राहावे, अशी ईच्छा व्यक्त करत होतो.

त्‍यांना उशिरा कळले

आता त्यांना कळले राहुल गांधी हे सावरकर यांना विरोध करत आहे. मात्र राहुल गांधी हे आधीपासूनच विरोध करत होते. हे त्यांना उशिरा कळले आहे. आता त्यांना शिंदे गट व 50 आमदार भाजपकडे का गेले? हेही कळले असावे. उशिरा का होईना आता संजय राऊत व त्यांच्या सहकार्याना शहानपण आले असल्याच्या खोचक टोला अपक्ष आमदार नरेद्र भोंडेकर यांनी संजय राउत यांना लगावला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com