Nana Patole News: ते काय पाकिस्तानात जावून हनुमान चालीसा पठन करणार; नाना पटोलेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Bhandara News : ते काय पाकिस्तानात जावून हनुमान चालीसा पठन करणार, मोदी हे चीनच्या दबावाखाली; नाना पटोलेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
Nana Patole
Nana PatoleSaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : हिमाचल प्रदेश आणि अरूणाचल प्रदेश चीनच्या ताब्यातून सोडवू शकत नाही; ते काय पाकिस्तानात जावून हनुमान चालीसाचे पठन करणार. नरेंद्र मोदी हे चीनच्या दबावाखाली आहेत. हे जँकेट घालून पोकळ घोषणा देणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर (Nana Patole) नाना पटोले यांनी नाव घेता (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. (Live Marathi News)

तो दिवस दूर नाही की, (Bhandara) पाकिस्तानात जाऊनही आम्ही हनुमान चालिसा म्हणून दाखवू. असे देवेंद्र फडणवीस अमरावतीत म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देतांना नाना पटोले बोलत होते. 

Nana Patole
Tanaji Sawant News: डॉ. तानाजी सावंतांच्या पुतळ्याला जोडे मारुन केले दहन

भाजप सरकारवर टिकास्र
संभाजी भीडे हे मनोहर कुळकर्णी असून हा भाजपचा हस्तक आहे. तर मराठा आणि ओबीसींमध्ये भानगड लावण्याचे काम  भाजपकडून होत असून महाराष्ट्रातून फुले, शाहू, आँबेडकरांचे विचार संपविण्याचे पाप करणे सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात (BJP) भाजपची सत्ता आहे. मग मराठ्यांना आरक्षण द्यायला काय जाते. फक्त भाजपवाले पोकळ आश्वासने देत असल्याचे टिकास्र नाना पटोले यांनी भाजप सरकारवर सोडले.

Nana Patole
Jalgaon News: बँकेत जात असल्याचे सांगून घरातून निघाला; वाटेतच मृत्यूने गाठले

काँग्रेसने आता यात्राच करीत राहावे असे म्हणून कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जनसंवाद यात्रेची खिल्ली उडविली होती. यावर बोलताना नाना पटोले म्हणालेत की, काँग्रेस हा देशाचा पक्ष असून भारत महासत्ता बनावी ही काँग्रेसची भुमिका राहीलेली आहे. भाजपाचे स्वातंत्र्य लढ्यात काहीच योगदान नसून त्यांनी फक्त इंग्रजांची चाटूगिरी करण्याचे काम केले आहे.असा गंभीर आरोप मंत्री खाडे यांना प्रत्युत्तर देतांना भाजपावर केलाय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com