Tiger Death News: कोका अभयारण्यातील वाघाचा अचानक मृत्यू, नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Bhandara News : खुर्शिपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यात T13 या पट्टेदार वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला आहे.
Bhandara Tiger Death News
Bhandara Tiger Death NewsSAAM TV

Koka Wildlife Sanctuary Tiger Death News : नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खुर्शिपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यात T13 या पट्टेदार वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तीन दिवसापासून हा मृतदेह पाण्यात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना T13 या वाघाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच नवेगांव-नागझिराच्या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकासह वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान पशू वैद्यकीय अधिकारी यांनी शव विच्छेदन केले असून मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Bhandara Tiger Death News
BCCI Contracts: टीम इंडियाचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर, रवींद्र जडेजाला मिळालं प्रमोशन; केएल राहुलची घसरगुंडी

या वाघाचे सर्व अवयव व्यवस्थित असल्याने वाघाच्या अवयवासाठी शिकारीची शक्यता नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय चमू त्यांचा अहवाल आज देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज वाघाचे मृत्युचे नेमके कारण स्पष्ठ होऊ शकते. (Bhandara News)

लांडग्यांच्या हल्ल्यात 5 शेळ्या ठार

भंडारा जिल्हाच्या लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे लांडग्यांच्या हल्ल्यात 5 शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली. धीरज बाळकृष्ण घरडे रा. ईटान असे त्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकून धीरज घरडे यांना जाग आली. तेव्हा त्यांना हा प्रकार समजला.

Bhandara Tiger Death News
Horoscope Today : या राशीसाठी 'जो जे वांछिल तो ते लाभो!' असा दिवस, अचानक होईल धनलाभ

या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली असून घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेत सदर पशुपालकाचे एकूण 60 हजाराचे नुकसान झाले असून पशुपालकासह गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (Latest Marthi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com