Bhandara Crime : तलवारीने केक कापणे पडले महागात
Bhandara News: तलवारीने केक कापणे पडले महागात Saam Tv

Bhandara Crime : तलवारीने केक कापणे पडले महागात

भंडारा पोलीसांनी दोघांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : वाढदिवसाच्या दिवशी तलवारी घेऊन भाईगिरी करत व्हाट्सएपवर व्हिडीओ व्हायरल करणे दोन युवकांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) गुन्हा नोंद केला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील भोजापुर येथील सुभाष वार्ड परिसरात संबधित घटना घडली असून ह्या प्रकरणी निखिल उर्फ निकेश अंकुश बावने वय 22 वर्ष व गणेश राजेश बागडे वय 20 वर्ष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून दोन्ही तलवारी जप्त करण्यात आल्या आहे.

Bhandara News: तलवारीने केक कापणे पडले महागात
Mumbai Breaking: भेसळयुक्त दूधाची विक्री करणारे गजाआड

23 ऑगस्टला निखिल उर्फ निकेश अंकुश बावने व गणेश राजेश बागडे ह्या दोघांचा वाढदिवस होता. घटनेच्या दिवशी आरोपींनी भोजापुर येथील सुभाष वार्ड परिसरात वाढदिवस साजरा करत असतांना केक कापन्यासाठी तलावारींचा वापर केला. शिवाय तलवारी घेऊन त्याचे फोटो सेशन केले. इतकेच नाही तर चक्क त्यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर भंडारा पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. काल 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करत दोन लोखंडी तलवारी जप्त केल्या आहे.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com