टपाल कर्मचा-याने पत्नीच्या नावावर केले तीन लाख जमा; 420 दाखल

टपाल कर्मचा-याने पत्नीच्या नावावर केले तीन लाख जमा; 420 दाखल
Money

भंडारा : टपाल खात्यामधील बंद आवर्ती खात्यावर (recurring deposit) पत्नीचे नाव लावून तब्बल तीन लाख दहा हजार 759 रूपये money टपाल खात्यातील post office कर्मचा-याने लाटल्याची घटना भंडारा शहरातील मुख्य टपाल कार्यालयात घडली आहे. सहाय्यक डाक व तंत्र सहाय्यक म्हणुन कार्यरत अधिकारी असलेल्या पुंडलिक मुसळे (रा. जांबुळवाडी, जिल्हा नांदेड़) असे संशियताचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध भंडारा शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bhandara-police-registered-case-post-office-employee-crime-news)

याबाबतची अधिक माहिती पाेलिस निरीक्षक लोकेश कानसे यांनी दिली. सन 2015-16 या कालावधीत संशयित पुंडलिक मुसळे याने आपल्या पदाचा गैरवापर करून बंद असलेले आवर्ती जमा (RD) खात्यामधील माहिती जमा करून संबंंधित माहितीचा दुरपयोग करून त्या खात्यातील रक्कम काढून घेतली. तसेच बंद आवर्ती खात्यावर मुसळेने स्वतःच्या पत्नीचे नाव त्यात नमूद केले.

या खात्यातील तीन लाख दहा हजार 759 रुपये काढले. परिणामी या कृत्यामुळे मुख्य डाकघर यांची फसवणूक झाल्याने या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनूसार पुंडलिक मुसळे याच्या विरुद्ध भंडारा शहर पोलिस ठाण्यात कलम 409 ,420 भादवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास भंडारा पोलिस करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com