चकारावासियो आता 5 च्या आत घरात; नवीन लॉकडाउन नियम नाही तर 'हे' आहे कारण
चकारावासियो आता 5 च्या आत घरात; नवीन लॉकडाउन नियम नाही तर 'हे' आहे कारणअभिजीत घोरमारे

चकारावासियो आता 5 च्या आत घरात; नवीन लॉकडाउन नियम नाही तर 'हे' आहे कारण

वनविभागाने दिले सर्तक राहन्याचा सूचना

अभिजीत घोरमारे

भंडारा - चकारावासियो Chakara आता 5 च्या आत घरी परत या. कारण गावात मादी बिबट्यासह Leopard तिच्या पिल्ल्यांचा वावर आहे. भंडारा Bhandara जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरातील चकारा गावात प्रमोद कोचे Pramod Koche यांच्या घरी आंगणात चक्क बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले आहे.

केवळ एका बिबट्यांचे नाही तर सोबत अनेक लहान मोठ्या आकाराच्या बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले आहे. दरम्यान अड्याळ वनविभागाच्या पथकाने भेट देत पावलांच्या ठशांची शहानिशा करत गावकऱ्यांना सावध केले आहे.

विशेष म्हणजे मागील महिन्यात चकारा येथील पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बिबट्याचा बछडा आढळला असून सायंकाळी मादी बिबट्या पिलाला तोंडात घेऊन जंगला कडे जातांना कॅमेरात दिसली होती.

चकारावासियो आता 5 च्या आत घरात; नवीन लॉकडाउन नियम नाही तर 'हे' आहे कारण
सौरव गांगुलीनी दिली रिषभ पंतच्या तब्येतीची माहिती; म्हणाले, त्याला...

दरम्यान, गावात पुन्हा बिबट्याच्या हजेरीने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे 5 नंतर संध्याकाळी घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहे. अत्यावश्यक काम असल्यास तीन-चार लोकांनी हातात काठ्या सोबत घेऊन जाणाच्या सूचना दिल्या गेल्या आहे. त्यामुळे लॉकडाऊन मुळे नाही तर बिबट्याच्या परिसरात वावरमुळे चकारा गावात संध्याकाळी सुनसान वातारण असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com