भंडाऱ्यात निर्भयासारखी घटना, पीडितेच्या ५ शस्त्रक्रिया कराव्या लागणार - नीलम गोऱ्हे

भंडाऱ्यात मदतीचे आश्वसान देऊन एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला जंगलात नेवून तिच्यावर अत्याचार करत मारहाण केल्याची धक्कादायक घडली आहे.
Neelam Gorhe
Neelam GorheSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : भंडाऱ्यात (Bhandara) ३० जुलै रोजी मदतीचे आश्वसान देऊन एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला जंगलात नेवून तिच्यावर अत्याचार करत मारहाण केल्याची धक्कादायक घडली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी या प्रकरणावर भाष्य करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घेतली नसल्याचा आरोपही केला आहे.

त्या म्हणाल्या, 'एका विवाहित महिला माहेर गावी निघाली असता तिला एक व्यक्तीने गावी सोडतो असं सांगून जंगलात ३० आणि ३१ तारखेला तिच्यावर पाशवी अत्याचार केले. गावकऱ्यांनी पोलिसांना कळल्यावर घटना समोर आली आहे.

वर्तमानपत्राने दखल घेतली मग कळाले. मी पोलीस महानिरीक्षक यांच्याशी बोलले आहे. अजूनही या प्रकरणातील एक आरोपी सापडला नाही. तिचे कुटुंब गरीब आहे. पीडितेच्या पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. शिवाय ही घटना निर्भया सारखी असून पीडितेची झुंज सुरू असल्याचं त्या म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ -

तसंच मूळ आरोपी अजून पकडला नाही. घटना घडल्या की प्रतिक्रिया देतो पण मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आहेत. जंगलात जाताना चेक पोस्ट असतात मग कुठलीच देखरेख नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व पक्षांनी एकत्र येऊन शक्ती कायदा झाला होता. अशा वेळी मार्चपासून आतापर्यंत केंद्र सरकारकडे शक्ती विधेयक प्रलंबित आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी अभिप्राय मागितल्यावर तो दिला आहे. पण अजूनही कायद्याला मंजुरी का दिली नाही?

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची दखल घेतली नाही. मी उपसभापती म्हणून निर्देश देते की, या घटनेबाबत दखल घ्यावी, या घटनेमुळे स्त्रीया किती असुरक्षित आहे हे पुन्हा समोर येत आहे. शिवाय मनात आता प्रश्न येता या घटनेबाबत आता नीरव शांतता आहे आता कोणी बोलत नाही. शिवाय शक्ती कायदा झाला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत आहेत तर त्यांनी प्रक्रिया करावी मागच्या सरकारने कायदा केला म्हणून दूजाभाव करू नये असंही त्या म्हणाल्या.

Neelam Gorhe
Satara : दहा महिन्याच्या बाळास टाकलं विहिरीत; कुटुंबाची चाैकशी सुरु

दरम्यान, मावळ तालुक्यात एक बालिका अत्याचार करून हत्या केली. त्या कुटुंबाला धीर दिला. आम्ही त्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत. पोलीस महासंचालक आम्ही भेटलो त्यात मावळ घटना उल्लेख आहे. रजनीश सेठ यांनी आश्वासन दिले होते कारवाई करू, शिवाय मावळ घटनेत सरकारी वकिल द्यावा अशी मागणी देखील नीलम गोर्हे यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com