भंडा-यात ट्रकने दुचाकीला ठाेकरले; युवकाचा मृत्यू

भंडा-यात ट्रकने दुचाकीला ठाेकरले; युवकाचा मृत्यू
bhandara accident news

भंडारा : भंडारा शहरात राजीव गांधी चौकात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात bhandara road accident झाला आहे. वेगाने येणाऱ्या ट्रकने एका दुचाकीला धड़क दिल्याने ट्रकच्या टायरमध्ये सापडुन दुचाकी चालकाचा जागीच मृत्यु झाला आहे. (bhandara-youth-died-in-road-accident-sml80)

शुभम देशभरतार (वय 32) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो भंडारा शहरातील एका दवाखान्यात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत हाेते.

शुभम हा दवाखान्यातून काम संपल्यानंतर घरी परत असताना ही दुर्देवी घटना घडली.या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. अपघाटाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. तेथे पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यातत आले आहे.

भंडारा शहर पोलिस ट्रकचालकाचा शोध घेताहेत. विशेषत: भंडारा शहरात सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत जड वाहनास प्रवेशासाठी बंदी आहे. निर्धारित वेळेत शहराबाहेरुन असलेल्या सलेल्या बायपास वरुन जड़ वाहने ने-आण होते. परंतु रात्री नऊ नंतर जड़ वाहनास शहरातून प्रवेश दिला जात असल्याने सुसाट वेगाने जड़ वाहन जात असल्याने असे अपघात घडताहेत. त्यामुळे आता कोणत्याही जड़ वाहनाला प्रवेश देण्यास मनाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com