Ahmednagar News Today: नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार; प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढणार, 35 हून अधिक सरपंच BRS च्या वाटेवर

Ahmednagar News Today: अहमदनगर जिल्ह्यात बीआरएस झपाट्याने विस्तार करत असून प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे.
Ahmednagar News Today
Ahmednagar News TodaySaam tv

सचिन बनसोडे

Ahmednagar News: राष्ट्रवादी, शिवसेना असा राजकीय प्रवास केलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी महिनाभरापूर्वी बीआरएस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता तालुक्यातील अनेक सरपंच बीआरएसच्या वाटेवर असून 35 हून अधिक सरपंच हे बीआरएस मध्ये येणार असल्याचं भानुदास मुरकुटे यांनी स्पष्ट केलंय. अहमदनगर जिल्ह्यात बीआरएस झपाट्याने विस्तार करत असून प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील अनेक माजी सरपंच उपसरपंच यांनी थेट वाहनाने तेलंगणात जात बीआरएस मध्ये प्रवेश केला आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातीलही अनेक सरपंच बीआरएसच्या वाटेवर आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील मोठे राजकीय प्रस्थ असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शंभराहून अधिक कार्यकर्त्यांसह तेलंगणामध्ये जात मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

Ahmednagar News Today
Ahmednagar Politics : चर्चा तर होणारच! रोहित पवार-सुजय विखे पाटील यांच्या बॅनरनं कर्जत तालुका ढवळून निघाला

मुरकुटे यांना राज्याच्या कमिटीत घेण्यात आल्याने श्रीरामपूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मुरकुटे यांचे प्राबल्य असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील जवळपास 35 ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य यांसह अनेक माजी सरपंच, उपसरपंच बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.

बीआरएस राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 आणि विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवणार असल्याचे भानुदास मुरकुटे यांनी सांगितलंय.. त्यामुळे राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वात बीआरएस ताकत लावणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील अनेक सरपंच भानुदास मुरकुटे यांच्या निर्णयाबरोबर असून त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार असल्याचं हे सरपंच म्हणत आहेत. आम्ही अनेक जण तेलंगणा राज्यात जाऊन आलो. तिथे सुरू असलेली विकास कामे आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे या योजना आपल्याकडे सुरू व्हाव्यात, यासाठी भविष्यात काम करणार असल्याच सरपंचांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 50 ते 60 हजार मतांवर प्रभाव असणाऱ्या मुरकुटे यांना अनेक सरपंच पाठिंबा देत असल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.

Ahmednagar News Today
Sharad Pawar - Ajit Pawar Meeting: शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट? अर्ध्या तासाच्या चर्चेत नेमकं काय झालं...

बीआरएसच्या वतीने श्रीरामपूर तालुक्यातील ३०० शेतकरी महिलांसाठी नुकतीच मोफत पंढरपूर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर अनेक महिलांना तेलंगणा राज्यात नेऊन तेथील विकास योजना दाखवणार असल्याचे भानूदास मुरकुटे यांच्या सून मंजुश्री मुरकुटे यांनी सांगितलं.

एकीकडे राज्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असताना BRS ने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी कंबर कसली आहे. ग्रामीण भागातून BRS ला वाढता प्रतिसाद बघता आगामी काळात महाविकास आघाडीसह महायुतीचे देखील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com