मला महाराष्ट्राचा प्रभारी मुख्यमंत्री करा; औरंगाबादच्या पठ्ठ्याची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

एका पत्राद्वारे या पठ्ठ्याने ही केली आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद - सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील सत्ताधारी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे राज्यात सत्तांतर होणार का चर्चांना उधाण आले आहे. अशातच औरंगाबादच्या (Aurangabad) एका पठ्ठ्याने मला महाराष्ट्राचा प्रभारी मुख्यमंत्री (Chief Minister) करा अशी मागणी थेट राष्ट्रपतींकडे (President) केली आहे. एका पत्राद्वारे या पठ्ठ्याने ही केली आहे. भारत फुलारे असे या पठ्ठ्याचे नाव असून हा औरंगाबाद येथील रहिवाशी आहे.

हे देखील पाहा -

भारत फुलारे यांनी आपल्या मागणीचे पत्र ई-मेल द्वारे देशाच्या राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठवले आहे. त्यात असे लिहिले की, महाराष्ट्रात सध्या स्थिर सरकार नसल्याने महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी देखील स्वतःचे राज्य सोडून जनतेची काळजी न करता खुर्ची व पदासाठी परराज्यात जाऊन बसले. तसेच राज्याचे राज्यपाल यांना देखील दुर्दैवानं कोरोना झाल्यामुळे त्यांचा पदभार परराज्यातील राज्यपालांना सोपवावा लागला.

Aurangabad News
पर्यायी सरकार देण्यावर भाजपचे एकमत; दिल्लीत खलबतं करुन फडणवीस मुंबईत

यामुळे महाराष्ट्राची जनता अगदी पोरकी झाली आहे. महाराष्ट्रातील अशा अघोरी राजकारणामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहू लागले व जनता अगदी हतबल झाली आहे. म्हणून जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकारण स्थिर होऊन मुख्यमंत्रिपद स्थिर होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा प्रभारी पदभार जनतेच्या हिताचा विचार करून माझ्याकडे सोपवावा अशा प्रकारचे पत्र त्यांनी ई-मेल द्वारे पाठवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com