संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले - डॉ.भारतभूषण क्षीरसागर

महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचा गंभीर आरोप
संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले - डॉ.भारतभूषण क्षीरसागर
संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले - डॉ.भारतभूषण क्षीरसागरSaamTvnews

बीड : पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय झाली आहे. अशी जहरी टीका काका नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर (Bharatbhushan Kshirsagar) यांनी केली आहे. शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचे काम कोणी केलं ? असा सवाल उपस्थित करत राजकीय स्पर्धा असावी, मात्र ती विकासात खोडा घालणारी नसावी.

हे देखील पहा :

मी 88 कोटी आणले तर तुम्ही 100 कोटी आणा. असा थेट आव्हानरुपी घणाघात आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यावर केला आहे. तुम्ही आमदार व्हा म्हणून माझ्यात विष कालविण्याचे काम केले. 35 वर्ष झाले मी नगराध्यक्ष आहे. माझे वय 60 वर्ष झाले. मात्र मी कधीही आमदार व्हायचं म्हणालो नाही. रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) पुतण्या गॅंग झाली आहे. परळीत, बारामतीत आणि बीडमध्ये पुतण्या गँग आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.