भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडण्याच्या तयारीत ? बाळासाहेब थोरात म्हणाले...

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गहिरं संकट असतानाच, आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडण्याच्या तयारीत ? बाळासाहेब थोरात म्हणाले...
Balasaheb ThoratSaam TV

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकावून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (mva government) गहिरं संकट असतानाच, आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचं बंड सुरू असतानाच, भाजपकडून (bjp) काँग्रेसचे आमदार (congress mla) फोडण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त माध्यमांवर धडकले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, त्यावर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे ४४ आमदार आहेत. काँग्रेसमध्ये काहीही अडचण नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

Balasaheb Thorat
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण

विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही तासांतच एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतला गेले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या गोटात खळबळ उडाली. कालपासून महाविकास आघाडी सरकार कोसळेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतंच ट्टिवटरवर प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असे संकेत राऊत यांनी दिले. तर दुसरीकडे भाजपचे नेते कॉंग्रसचे आमदार फोडणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात मुंबईत कॉंगेसचे बडे नेते कमलनाथ आणि एच के पाटील यांनी कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावल्याचे कळते आहे.

Balasaheb Thorat
शिंदेच्‍या गटात जळगावातील आमदार; जिल्‍ह्यातील शिवसेनेत फुट

दरम्यान, याबाबत माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसच्या सर्व आमदारांसोबत आम्ही आहोत. कॉंग्रेसच्या सर्वच्या सर्व ४४ आमदारांचा महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा आहे, असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com