'फक्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिरच नव्हे तर...'; 'त्या' वादात भीम आर्मीनेही घेतली उडी

ज्ञानवापी प्रकरणाचा मुद्दा हा देशभर गाजत असताना हा विठ्ठल मंदिराचा नवा वाद समोर आल्याने लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
Vitthal Temple
Vitthal Temple Saam Tv

नागपूर : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ( Vitthal temple ) हे पूर्वीचे बुद्ध विहार होतं असा दावा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला. त्यानंतर विठ्ठल मंदिराच्या या नव्या वादात आता भीम आर्मीनं उडी घेतली आहे. वाराणसीतील ( Varanasi ) ज्ञानवापी प्रकरणाचा मुद्दा हा देशभर गाजत असताना हा विठ्ठल मंदिराचा नवा वाद समोर आल्याने लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. ( Vitthal Temple Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी पंढपूरचे पांडूरंग मंदिर हे पूर्वी बुद्ध विहार होतं असा दावा करत हे मंदिर पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करा अशी मागणी केली होती. या मंदिराच्या वादात भीम आर्मीनं उडी घेतली आहे. या नव्या वादावर भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी फक्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिरच नव्हे तर तिरुपती बालाजी मंदिर ही बुद्ध विहार असा दावा केला आहे. हा दावा करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'रिडल्स इन हिंदुइजम' आणि प्रबोधनकर ठाकरे यांच्या 'धर्माचे देऊळ आणि देवळांची धर्म' या पुस्तकांचा दाखला दिला आहे. लवकरच बौद्ध अनुयायांना घेऊन पंढपुरातील विठ्ठल मंदिरात सामूहिक बुद्ध वंदना घेणार असल्याचेही भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सांगितले. भीम आर्मीच्या या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vitthal Temple
"संभाजीराजेंना सन्मान देण्याची वेळ येते; तेव्हा शिवसेनेचा हात का आखडतो ?"

काय म्हणाले होते डॉ. प्रदीप आगलावे ?

डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले होते,'पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचे विहार होते,आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मुर्ती आहेत,यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती. तसेच आमची विहारं पाडून मंदिरं आणि मशिदी बनवल्या गेल्या" असा दावाही डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com