मक्याच्या शेतात लावला गांजा अन् शेतकऱ्याचा झाला वांदा, पोलिसांना मिळाली खबर, त्यानंतर...

प्रल्हादपूरमध्ये एका शेतकऱ्याने मक्याच्या शेतीत चक्क गांजाची रोपे लावली, त्यानंतर...
Ganja seized by police in jalna
Ganja seized by police in jalnasaam tv

लक्ष्मण सोळुंके

जालना : येथील भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळं खळबळ उडाली आहे. प्रल्हादपूरमध्ये एका शेतकऱ्याने मक्याच्या शेतीत चक्क (Ganja trees) गांजाची रोपे लावली. या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना (Police) खबर मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने शेतात जाऊन छापा टाकला. पोलिसांनी अंदाजे १ लाख रुपये किमतीच्या २१ किलो गांजाची रोपे जप्त करून आरोपीला अटक केली. आरोपी हा शेतमालक असून दगदूबा धोंडूबा खेकाळे असं त्यांचं नाव आहे. (Police seized ganja trees and arrested farmer in jalna)

Ganja seized by police in jalna
Mumbai : खड्डेमय रस्त्याचे घातले श्राद्ध; मनसेच्या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथील मक्याच्या शेतात अवैधरित्या गांजा लागवड केल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, विभागीय पोलीस अधिकारी बहुरे यांच्या पथकांनी प्रल्हादपूर गावातील गट क्रमांक ५१ मध्ये छापा टाकला.

Ganja seized by police in jalna
Mumbai : खड्डेमय रस्त्याचे घातले श्राद्ध; मनसेच्या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा

यावेळी शेताच्या बांधावर असलेल्या गवतात गांजाची रोपे लावलेली पोलिसांना आढळली. पोलिसांनी ही रोपे नष्ट करून शेतमालक दगदूबा धोंडूबा खेकाळेला अटक केली. आरोपी विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com