
बीड: राज्यात भोंगा आणि हनुमान चालीसावरून राजकारण तापला आहे. तर दुसरीकडे बीडच्या दौलावडगाव गावामध्ये हजरत सय्यद नसरुद्दीन शहा यात्रेच्या निमित्ताने, गावखेड्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचं उदाहरण समोर आलं आहे.
कोरोनाच्या 2 वर्षाच्या खंडानंतर आता गावखेड्यातील यात्रा आणि उत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहेत. बीडच्या (Beed District) आष्टी तालुक्यात असणाऱ्या दौलावडगाव येथील, हजरत सय्यद नसरूदीन शहा यात्रे निमित्त, हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रीत मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न करत आहेत. संदल, तमाशा, भव्य कुस्ती होत आहे. तर उद्या रात्री शेवटी कव्वालीचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे.
या यात्रेदरम्यान हिंदू-मुस्लीम बांधव एकत्रीत येऊन, नसरूदीन शहा यांच्या दर्ग्यास चादर चढवतात. यावेळी सर्व मुस्लिम व हिंदू बांधवांच्या वतीने हनुमान मंदीरात मारुतीरायास पुष्पहार अर्पण करण्यात आला असून हा उत्सव एकतेने संपन्न करत आहे. एकमेकांच्या आनंदात सहभागी होत आहेत, दौलावडगाव येथे हा तीन दिवस यात्रा उत्सव पार पडतो. दरम्यान एकीकडे राज्यात भोंगा आणि हनुमान चालीसा वरून राजकारण केले जात आहे. 2 धर्मात तेढ निर्माण होईल असं वातावरण बनत चाललं आहे.
तर दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील गावखेड्यात, आजही हिंदू-मुस्लीम भाई भाई म्हणत नागरिक राहत आहेत. आणि या दरम्यान गावखेड्यातील यात्रा उत्सव असेल तर सर्वजण एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करत आहेत. विशेष म्हणजे दर्ग्यावर हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत चादर चढवतात, तर गावातील हनुमान मंदिरात एकत्रित येत पुष्पहार देखील अर्पण करतात. यामुळे राज्यातील राजकारण्यांनी आता या गाव खेड्यातील ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.