Bhusawal Crime News: जुन्या वादातून तिघांची निर्घृण हत्या; तिहेरी हत्याकांडाने जळगावात खळबळ

Bhusawal Crime News: जळगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भुसावळच्या वखार परिसरातील दोन भावांची हत्या झाल्याची धक्काधायक घटना घडली आहे.
Bhusawal Crime News
Bhusawal Crime NewsSaam Tv

Bhusawal Crime News in Marathi

जळगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भुसावळच्या वखार परिसरातील दोन भावांची हत्या झाल्याची धक्काधायक घटना घडली आहे. तसेच काही तासातच एका कुविख्यात गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शांताराम भोलानाथ साळुंखे व राकेश भोलानाथ साळुंखे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या धक्कादायक घटनेनंतर श्रीराम नगर परिसरात कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या घटनेत निखिलचा मृत्य झाला. तिघांच्या हत्येने भुसावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Bhusawal Crime News
Dombivli Crime News : ५० हजारांचे कर्ज फेडण्यासाठी पावणे तेरा लाखांचे दागिने चाेरले, अवघ्या तीन तासांत डोंबिवली पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

जळगाव जिल्ह्यात खळबळ

जळगावमध्ये तिघांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे दोघांची हत्या होत नाही, तोवर काही वेळातच भुसावळ शहरात तिसऱ्या हत्या देखील घडली.

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघांची हत्येची घडली होती. त्याच्या काही तासातच कुख्यात गुन्हेगाराची हत्या झाली. या धक्कादायक घटनेने भुसावळसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Bhusawal Crime News
Bhandara Crime News : महिला सहकारी बँकेत १० लाखांची चोरी, चाेरट्यांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, भुसावळ शहरासह तालुक्यात हत्या, चोरीच्या वारंवार घटना घडू लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com