Nashik Political News : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, बबनराव घोलप यांचा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा

Shivsena News : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छूक होते.
Nashik Political News
Nashik Political News Saam TV

Nashik Political News :

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते आणि संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदावरून हटवल्याने नाराज बबनराव घोलप यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छूक होते. मात्र माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर घोलप नाराज होते. नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या शिर्डी दौऱ्यात देखील घोलप यांना डावलण्यात आलं होतं. (Latest News Update)

Nashik Political News
Uddhav Thackeray Speech: 'हे कसले लोहपुरुष? हे तर तकलादू पुरुष...' जळगावच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले

कोण आहेत बबनराव घोलप?

शिवसेना व भाजप युतीची सत्ता असताना बबनराव घोलप १९९५ मध्ये कॅबिनेट मंत्री होते. तसेच त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. देवळाली मतदारसंघाचे ते पाच वेळा आमदार होते. यावेळी शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा होती. (Political News)

Nashik Political News
Manoj Jarange Andolan : मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, कुणबी सेनेची मोठी मागणी

मात्र शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे बबनराव घोलप नाराज होते. शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळण्याची आता दाट शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com