Dapoli Crime: बँकेच्या ATMमध्ये पैसे लोडिंग न करता 55 लाख 50 हजार रुपयांची अफरातफर; दोघेजण दापोली पोलिसांच्या ताब्यात

Ratnagiri Crime News: याप्रकरणी दोन संशयितावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dapoli Police Station
Dapoli Police Stationजितेश कोळी

जितेश कोळी, रत्नागिरी

Dapoli Crime News: बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेले 55 लाख  50 हजार एटीएम मशीनमध्ये लोड न करता ते लंपास केल्याची धक्कादायक घटना दापोलीत घडली आहे. याप्रकरणी दोन संशयितावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनोल नाचरे व प्रथमेश शिर्के यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. (Dapoli Latest News)

Dapoli Police Station
Mumbai Crime: लॉकडाऊनमध्ये नोकरी गेलेल्या तरुणाची करामत; बनवाट सही करुन वृद्ध महिलेला ३ कोटी १४ लाखांचा गंडा

दापोली (Dapoli) पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड डोंबिवली या कंपनीकडे खेड आणि दापोली येथील बँकांच्या एटीएममध्ये (ATM) कॅश भरण्याचे काम आहे. या कंपनीचे ऑपरेटर अमोल अशोक नाचरे, रा. उंबर्ले, ता. दापोली आणि प्रथमेश विश्वनाथ शिर्के,रा. तळे, ता. खेड हे कर्मचारी आहेत. बँकेमधून कॅश घेऊन पैसे घेऊन ती एटीएम मशिनमध्ये लोडिंग करण्याचे काम हे दोघे कंपनीच्या वतीने दापोली आणि खेड विभागकरता देण्यात आले आहे.

11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अॅक्सिस बँकेच्या 3 आणि स्टेट बँकेच्या 2 एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी त्यांच्या कंपनीने दिलेले 55 लाख 50 हजार रुपये त्यांनी एटीएममध्ये न भरता या रकमेचा अपहार केल्याची तक्रार कंपनीचे शाखा व्यवस्थापक देवेंद्र चुडे, रा. नवी मुंबई, घणसोली यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही रक्कम येथील बँकेकडून ताब्यात घेऊन ती एटीएममध्ये लोड करायचे अत्यंत जबाबदरीचे आणि जोखमीचे काम या दोघांकडे देण्यात आले होते. मात्र या दोघांनीही तब्बल 55 लाख 50 हजार इतकी मोठी रक्कम ताब्यात घेऊन ती एटिएमध्ये लोडींग केली नाही.

Dapoli Police Station
धक्कादायक! तळवट धरणाचे दरवाजे अज्ञातानं उघडले; लाखो लिटर पाणी वाया, धरणाची सुरक्षा रामभरोसे...

त्यामुळे या रक्कमेचं नेमके काय झालं? या सगळ्या प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. दापोली पोलीस ठाण्यात या दोन संशयितांविरोधात भादवि 408,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक निनाद कांबळे करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com