पंढरपुरात वृक्ष लागवड योजनेत मोठा घोटाळा; 3 अधिकाऱ्यांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात अपहाराचा पहिला गुन्हा पंढरपुरात दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam Tv

पंढरपूर - 33 कोटी वृक्ष लागवड योजनेत बोगस मजूर दाखवून सुमारे 1 कोटी 25 लाख रूपयांचा आर्थिक घोटाळा समोर आले आहे. या प्रकरणी पंढरपूर (Pandharpur) येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या तीन अधिकाऱ्यांसह आठ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पाहा -

सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात अपहाराचा पहिला गुन्हा पंढरपुरात दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी शासनाच्या तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजनेत अधिकार्यांनी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार पंढरपूर येथील न्यायालयात केली‌ होती.

Pandharpur News
Kids Health Tips : मुलांना अॅलर्जी होतेय ? हे सामान्य आहे का ? याचे नेमके कारण काय ?

न्यायालयाने या तक्रारीची दखल घेऊन पंढरपूर शहर पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशी‌ करून सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर अहिरे,वन मजूर आंबन्ना जेऊर यांच्या अनोळखी पाच जणांवर वृक्ष लागवड योजनेत बोगस मजूर दाखवून सुमारे 1 कोटी 25 लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील अशा प्रकारचे घोटाळे समोर येण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com