बदलापुरात चोऱ्या वाढल्या; सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी २ दुचाकी चोरल्या

Badlapur Crime News : बदलापूरमध्ये दुकानफोडी, दुचाकी चोरी या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
bike theft caught on cctv camera in badlapur
bike theft caught on cctv camera in badlapurSaam Tv

अजय दुधाणे

बदलापूर : बदलापूरमध्ये दुकानफोडी, दुचाकी चोरी (Bike Theft) या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सततच्या होणाऱ्या चोरीमुळे बदलापूरकर त्रस्त झाले आहेत. त्यातच बदलापुरात पुन्हा दुचाकी चोरीची घटना घडली आहे. बदलापुरात सोसायटीच्या पार्किंगमधून २ दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. बदलापूरच्या (Badlapur) रमेशवाडी परिसरात ही घटना घडली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या दुचाकी चोरीप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (bike theft caught on cctv camera in badlapur)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिमेच्या रमेशवाडी परिसरात त्रिमूर्ती अपार्टमेंट नावाची सोसायटी आहे. या सोसायटीच्या आवारात सिद्धार्थ निकाळे यांनी त्यांची केटीएम ड्युक २०० आणि नितेश माने यांनी त्यांची अपाची १६० या गाड्या पार्क केल्या होत्या. बुधवारी १८ मे रोजी मध्यरात्री दोन अज्ञात चोरटे त्यांच्या सोसायटीत घुसले. त्यांनी या दोन्ही गाड्या ढकलत चोरून नेल्या. हा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सदर चोरट्यांचा शोध घेत आहेत.

bike theft caught on cctv camera in badlapur
नागपूर हादरलं! इसमाची विचित्र पद्धतीने हत्या; नंतर नाल्यात फेकला मृतदेह

दरम्यान, १० मे रोजीच्या रात्री देखील बदलापूर पश्चिमेच्या बेलवलीतल्या ग्रीन पार्क सोसायटीतूनही अशाचप्रकारे केटीएम ड्युक मोटारसायकल चोरून नेण्यात आले होती. त्यानंतर पुन्हा एकदा सोसयटी पार्किंगमधून दोन दुचाकी चोरी गेल्या आहेत. त्यामुळं हल्ली सोसायटीच्या आवारात लावलेल्या गाड्याही सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळत आहे. बदलापुरात सोसायटीतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं रहिवाशी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बदलापुरात पोलीसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर दुचाकी चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाश्यांकडून होत आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com