नगरमध्ये चालतो बिंगो जुगार, पकडला तरच चोर

नगरमध्ये चालतो बिंगो जुगार, पकडला तरच चोर
Crime News

अहमदनगर : नगर जिल्ह्यात बहुतांशी तालुक्यात अवैध धंदे सुरू आहेत. जुगार आणि दारूचा व्यावसाय करणारे महाभाग आहेत. जुगार खुलेआम सुरू आहे. पोलिस अधिकारी बदलले तरच कारवाई होते. अन्यथा या धंद्यांना यंत्रणेचेच अभय आहे. पकडला तरच गुन्हेगार नाही तर तो उजळ माथ्याने व्यावसाय करतो.

नेवासे तालुक्यातील कुकाणे येथे सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तेरा बिंगो जुगाऱ्यांना अटक करत ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

Crime News
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांत बदल; 'या' नेत्याचे नाव वगळले

नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार काल कुकाणे येथील देडगाव चौकातील एका हॉटेलच्या आडोशाला बिंगो नावाचा जुगार चालू होता. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकला. त्यात भागवत गिनदेव वनवे (वय २१, रा.आखारबाग ता. पाथर्डी), लक्ष्मण बबन मासाळकर ( वय २०,रा.नाथनगर, ता. पाथर्डी), सचिन रामु साळवे वय २०), संजय कुंडलिक घाडगे (वय ३२, दोघे रा. तेलकुडगाव ता.नेवासे), 5)गणेश मोहन वाबळे ( वय २६), नामदेव रामभाऊ सरोदे (वय ३१, दोघे रा.अंतरवली ता.नेवासे), स्वप्निल घोरडे ( वय ३६, रा. कुकाणे, ता.नेवासे), विलास एकनाथ आहेर ( वय ३१, रा.दहेगाव ने ता.शेवगाव), संकेत विजू गर्जे (वय १९, रा.वडुले ता.नेवासे), अशोक विठठल चावरे (वय ३०, रा.दहिगाव ने, ता.शेवगाव), संदीप हरीभाऊ काळे (वय ४०, रा. तेलकुडगाव ता.नेवासे), अंकुश उत्तम घुटे (वय २७, रा.कुकाणे ता.नेवसे) या बिंगो जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. बिंगो जुगार मालक नितिन शिवाजी धोत्रे (रा. विजयनगर, पाथर्डी शहर) हा फरार झाला आहे. Bingo gamblers arrested in Nevasa

दरम्यान पोलिसांनी वरील आरोपींची झडतीतील रोख राकमेसह बिंगो जुगार साहित्यासह एकूण ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कुकाणे येथील देडगाव चौक हा अवैध धंद्याचा अड्डडा बनले आहे. पोलिसांनी या परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची गरज आहे. या व्यावसायतूनच या चौकात अनेक वेळा हाणामाऱ्या झाल्याचे प्रकार घडले आहेत.Bingo gamblers arrested in Nevasa

" तालुक्यासह कुकाणे व परिसरातील सर्व अवैध धंद्याविरोधात कारवाईची मोहीम उघडणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात चालू असलेल्या अवैध धंदे विषयी माहिती पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com