सावंतवाडी माजगाव येथे भर रस्त्यात भल्यामोठ्या गव्यांच्या कळपाचे दर्शन!
सावंतवाडी माजगाव येथे भर रस्त्यात भल्यामोठ्या गव्यांच्या कळपाचे दर्शन!अनंत पाताडे

सावंतवाडी माजगाव येथे भर रस्त्यात भल्यामोठ्या गव्यांच्या कळपाचे दर्शन!

काहींच्या मोबाइलमध्ये दृश्य कैद; परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण…

सिंधुदुर्ग - सावंतवाडी माजगाव येथे भर रस्त्यात आज भल्यामोठ्या चार-पाच गव्यांच्या कळपाने दर्शन दिले. ही घटना येथील साधले वडापाव हॉटेल नजीक सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान त्या ठिकाणावरून जाणाऱ्या काहींनी ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे. तर परिसरात दिवसाढवळ्या गवे फिरू लागल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा -

सावंतवाडी-इन्सुली रस्त्यावर हा गव्यांचा कळप आढळून आला. त्या मार्गाने जाणाऱ्यांच्या तो निदर्शनास पडला. त्यातील काहींनी ते दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे. दरम्यान परिसरात दिवसाढवळ्या गवे फिरू लागल्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com